पुणे दि.२४ : "ज्योतिष ही निखालस अंधश्रद्धा असून त्याला शास्त्राचा कोणताही आधार नाही, याच अंधश्रद्धेतून पालकर कुटुंबियांचा बळी गेला असून फुले-आगरकर यांच्यासारख्या सुधारकांच्या भूमीत अश्या घटना म्हणजे समाजाला कलंक आहे, समाजाने अंतर्मुख होऊन याचा विचार करायला हवा" असे मत अनिसचे संस्थापक कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर "फलज्योतिषाला विरोध कशासाठी? व कशाप्रकारे?" या कार्यक्रमात व्यक्त केले याप्रसंगी अंनिस [...]
"श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन्ही गोष्टी मूळ भावनेशी निगडित आहेत. आजची श्रद्धा ही उद्याची अंधश्रद्धा ठरू शकते. म्हणूनच समाजात जेव्हा श्रद्धेचा गैरवापर होतो किंवा तिचे प्रमाण वाढते तेव्हा तिचे रूपांतर अंधश्रद्धेत होते. म्हणूनच समाजाने शहाणे होऊन अंधश्रद्धा वाढू नये, यासाठी प्रयत्न करावेत,'' असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी केले. येथील नानासाहेब य. ना. [...]
डोक्यावर फरशी ठेवून फरशीवालेबाबा रोग निदान करतात व झाडपाल्याद्वारे औषध देतात. बोगस वैद्यकीय व्यावसायिक प्रतिबंधात्मक कारवाईसंबंधी जो कायदा आहे , त्याप्रमाणे हे उपचार करणे हा एक ते तीन वषेर् सक्तमजुरीचा गुन्हा आहे. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली बोगस डॉक्टर कारवाई समिती असते. पोलिस उपअधीक्षक , जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्याधिकारी त्याचे सदस्य असतात. मी नाशिक जिल्हाधिकारी [...]
सध्या अंधश्रद्धानिर्मूलन विषयक विधेयकासंबंधी चर्चा चालू आहे. बरेच लोक अंधश्रद्धेला विरोध करतात; परंतु बहुतांशी तो शाब्दिक असतो. अंधश्रद्ध लोकांची संख्या आपल्या समाजात मोठी आहे. त्या मानाने अंधश्रद्धा विरोधकांची संख्या नगण्य आहे. राजकीय नेते लोकशाहीत बहुसंख्याकांना दुखवायला तयार नसतात. त्यामुळे आपले व आपल्या पक्षाचे मतदार कमी होतील, अशी भीती त्यांना वाटते. ती चुकीची म्हणता येणार नाही. [...]
समितीच्या व समितीशी संबंधीत बातम्यांसाठी हे स्वतंत्र संकेतस्थळ आहे. यावर समितीच्या बातम्या तसेच प्रसिद्धी पत्रे पाहावयास मिळतील.